कोईम्बतूर - शौचालयाची टाकी साफ करताना श्वसनाद्वारे विषारी वायू शरीरात गेल्यामुळे ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी किलांथम भागात घडली आहे.
शौचालयाची टाकी साफ करताना तामिळनाडूत ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू - गुन्हा
शौचालयाची टाकी साफ करताना श्वसनाद्वारे विषारी वायू शरीरात गेल्यामुळे ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे अद्याप सांगितलेली नाहीत. या घटनेचा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून पुढील तपास सुरू आहे. गुजरातमध्येही एका हॉटेलमध्ये शौैचालयाची टाकी साफ करताना ४ कामगारांचा मृत्यू झाला होता. १५ जून रोजी ही घटना घडली होती.
यापूर्वीही शौचालयाची टाकी साफ करताना अनेक कामगारांचा मृत्यू झालेल्या घटना घडल्या आहेत. परंतु, यावरती कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे यापुढेही कामगारांचा जीव मुठीत घेऊनच काम करावे लागत आहे.