महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 21, 2019, 10:02 AM IST

ETV Bharat / bharat

भारतीय वायुसेनेला मिळाली तीन 'राफेल' विमाने, वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू

तीन राफेल विमाने ही भारतीय वायुसेनेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. भारतीय वायुसेनेचे वैमानिक आणि तंत्रज्ञ हे फ्रान्समध्ये त्यांचा वापर करून प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेमध्ये दिली.

Three Rafale jets handed over to IAF by France says Govt

नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेला तीन राफेल विमाने सुपूर्द करण्यात आली आहेत. वायुसेनेचे वैमानिक आणि तंत्रज्ञ सध्या या विमानांचा वापर करुन प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती सरकारने काल (बुधवार) दिली.

आठ ऑक्टोबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन पहिल्या राफेल विमानाचा ताबा घेतला होता. चार विमानांचा समावेश असणारी राफेलची पहिली बॅच ही मे २०२० पर्यंत भारतात दाखल होणार आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमानांसाठी साधारणपणे ५९ हजार करोड रुपयांचा करार झाला होता.

यामधील तीन राफेल विमाने ही भारतीय वायुसेनेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. भारतीय वायुसेनेचे वैमानिक आणि तंत्रज्ञ हे फ्रान्समध्ये त्यांचा वापर करून प्रशिक्षण घेत आहेत. अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेमध्ये दिली. मात्र, राजनाथ सिंह यांनी पहिल्या विमानाचा ताबा घेतल्यानंतर, बाकी दोन विमाने भारताच्या ताब्यात कधी देण्यात आली याबाबत श्रीपाद यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

'एमएमआरसीए'च्या बैठकीला ठरलेल्या किंमतीपेक्षा या विमानांची किंमत २.८६ टक्के कमी असल्याचेही श्रीपाद यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details