बंगळुरू - कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडीमध्ये कंटेनरच्या धडकेत महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका दोन वर्षांच्या मुलाचाही बळी गेला आहे. अपघातात इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
बेळगावातील दुर्गा दौडीला कंटेनरची धडक; अपघातात महाराष्ट्रातील तीन ठार; २ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत.. - Shirala Accident today
दुर्गादेवी उत्सवासाठी बेळगावी जाणाऱ्या दुर्गामाता दौडकरींच्या एका समूहाला कंटेनर धडकून हा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तीनही महाराष्ट्राच्या शिराळा तालुक्यातील गणेशवाडी गावचे रहिवासी होते.
दुर्गादेवी उत्सवासाठी बेळगावीकडे जाणाऱ्या दुर्गामाता दौडकरींच्या एका समुहाला कंटेनर धडकून हा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तीनही महाराष्ट्राच्या शिराळा तालुक्यातील गणेशवाडी गावचे रहिवासी होते. संजय रावसाब पाटील (४०), सचिन कारगौडा पाटील (३५) आणि हंसेना गूलाप्पनवार (०२) अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा : कोल्हापूरच्या गिरगावमध्ये पार पडली गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा; पाहा काय असते ही स्पर्धा