श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील बाटमलू भागात गुरुवारी सकाळीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा दलांना याठिकाणी दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आज पहाटे २.३० वाजेपासून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमार्फत अजूनही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.