रतलाम(मध्य प्रदेश) - जिल्ह्यातील राजीव नगर परिसरातील तीन मजली घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात पालक व त्यांची 21 वर्षीय मुलगी यांचा मृतदेह सापडला. घरात तीन मृतदेह असल्याची माहिती शेजार्यांनी सकाळी पोलिसांना दिली. तिघांनाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक गौरव तिवारी आणि एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
रतलाम : एका कुटुंबातील तिघांची हत्या रतलाम : एका कुटुंबातील तिघांची हत्या हेही वाचा -जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा
प्रकरण असे आहे
जिल्ह्यातील राजीव नगर येथे राहणारी 50 वर्षीय गोविंदसिंह सोलंकी, त्यांची 45 वर्षीय पत्नी शारदा आणि 21 वर्षीय मुलगी दिव्या यांचे मृतदेह त्यांच्या घराच्या दोन खोल्यांमध्ये सापडले आहेत. जवळच राहणाऱ्या भाडेकरूने तिघांचे मृतदेह पाहिले, तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती कळविली. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव तिवारी आणि एफएसएल टीम घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटना स्थळासह येथील आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि त्यांचे फुटेज तपासत आहेत. घटनास्थळावरील एफएसएल तपास पूर्ण झाल्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, सकाळी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती. शेजाऱ्यांची या तिघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मृत कुटुंबीयांच्या संबंधित व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.
हेही वाचा -दिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू