काशीपूर ( उत्तराखंड ) - कोरोना संसर्गामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. संचारबंदीमुळे अनेकांना उपासमारीचाही सामना करावा लागत आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सगळा देश एकवटला आहे. त्यातच कोशीपूर येथील तीन चिमुकल्यांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी या चिमुकल्या मुलींनी आपल्या गल्ल्यातील १९६३ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या चिमुकल्या मुलींचं परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. अनुष्का सैनी, एकता सैनी आणि गितांजली असे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करणाऱ्या चिमुकल्यांची नावे आहेत.
कोरोनाशी लढा देण्यासाठी सरसावले चिमुकले हात, गल्ल्यातील रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला - उधमसिंहनगर
कोरोनाशी लढा देण्यासाठी या चिमुकल्या मुलींनी आपल्या गल्ल्यातील १९६३ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. या चिमुकल्या मुलींचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

आठ वर्षीय अनुष्का उधमसिंहनगर येथील आर्यनगरात राहते. अनुष्काने सुल्तानपूर पट्टी येथील पोलीस चौकीतील ठाणे अंमदलारांकडे आपल्या गल्ल्यातील रक्कम सुपूर्द केली. तिच्यासह एकता सैनी आणि गितांजली या देखील होत्या. अनुष्काने डिसेंबरमध्ये आपल्या गल्ल्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. आठ वर्षीय चिमुकलीने आपल्या गल्ल्यातील पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्याने ठाणे अंमलदारांचे मनही हेलावले. ठाणे अंमलदार अनिल जोशी यांनी अनुष्काने दिलेली १९६३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले. आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेली रक्कम गरीबांच्या कामास येईल याची अनुष्काला अजिबात माहिती नव्हती. मात्र कोरोनाशी लढण्यासाठी आपण ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्याचे तिने यावेळी सांगितले.