पाटणा- बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये घराला आग लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमध्ये एक आजी आणि तिच्या दोन नातींचा होरपळून मृत्यू झाला.
मुंगेरच्या तारापुरमधील कहुआ मुसहरी गावातील ही घटना आहे. या गावात राहणारे बानो मांझी यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी दुलिया देवी या त्यांच्या दोन नातींसह झोपल्या होत्या. आग लागल्यामुळे या तिघींचाही मृत्यू झाला.