कुल्लू (हिमाचल प्रदेश) - श्रीखंड यात्रेला गेलेल्या गेलेल्या तीन भाविकांचा यात्रेदरम्यान नैसर्गिक मृत्यू झाला आहे. या विषयी माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने बचावपथकाला घटनास्थळी पाठवले आहे. बचावपथक तीनही भाविकांचे मृतदेह निरमंड येथे पाठवणार आहे. निरमंड येथे शवविच्छेदन केले जाणार आहे.
हिमाचल प्रदेशमधील श्रीखंड यात्रेला गेलेल्या तीन भाविकांचा मृत्यू - devotee death
प्रशासनाने २५ जुलैला श्रीखंड यात्रा बंद केली आहे. परंतु त्याच दिवशी एक जत्था श्रीखंड महादेवाच्या दर्शनासाठी पाठविण्यात आला होता. यादरम्यान ही घटना घडली आहे.
संग्रहीत छायाचित्र
मृतांमध्ये उपेंद्र सैनी (वय ४०, रा. खलीनी, शिमला), केवाल नंद भगत (रा. पश्चिम दिल्ली) आणि आत्म राम (रा. मौजपूर, दिल्ली) यांचा समावेश आहे.
प्रशासनाने २५ जुलैला श्रीखंड यात्रा बंद केली आहे. परंतु त्याच दिवशी एक जत्था श्रीखंड महादेवाच्या दर्शनासाठी पाठविण्यात आला होता. हा जत्था २८ जुलैला निरमंड येथे पोहोचला. यादरम्यान या जत्थ्यातील तीन भाविकांचा मृत्यू झाला.