आग्रा - आग्र्यात फटाक्यांनी भरलेल्या गोदामात स्फोट होऊन तीन लोक ठार तर, अनेकजण जखमी झाले. या स्फोटानंतर शहागंजचा संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. स्फोट इतका जोरदार होता की, दोन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.
आग विझविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी अग्निशमन दलाच्या जवानांसह स्फोटाच्या स्थळावर दाखल झाले. बचावकार्य सुरू झाल्यानंतर येथील जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. येथील ढिगारा साफ झाल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.