नवी दिल्ली- लुटीचा कट रचल्याप्रकरणी एका राष्ट्रीय स्तरावरील नौकायन या खेळ प्रकारातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूसह तिघा जणांना पोसिलांनी अटक केली आहे. संजय असे त्या आरोपीचे नाव असून या आरोपी खेळाडूला २ वेळा सुवर्ण पदक मिळाले आहे. मित्राला लुटण्यासाठी संजयने कट रचला होता. संजय यापूर्वी सीआरपीएफमध्ये पोलीस उपनिरक्षक होता. मात्र, त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्याच्यावर मित्राच्या घराचे कागदपत्र लुटण्यासंदर्भातील गुन्हा दाखल आहे.
तिमारपूर परिसरातील २७ तारखेला चाकूहल्ला करून लुटीची घटना घडली होती. त्या घटनेच्या तपासात संजयने मित्राच्या घराची कागदपत्रे एका असलम नावाच्या जागेचे खरेदी व्यवहार बघणाऱ्या दलालास देण्यासाठी कट रचला होता. या बदल्यात त्या दलालाकडून संजयला ६ लाख रुपये मिळणार होते. प्लॉट दाखवण्याचा बहाणा करत कागदपत्रे घेऊन जाताना लुटीच्या डाव साधण्यात आला होता. त्यानंतर तपासा अंती हा कट रचण्यात संजय याचाही हात असल्यचे समोर आले. पोलिसांनी कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अन्य दोघांनाही अटक केली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की 45 वर्षीय वृंदावन आजादपूर येथील भाजी मार्केटमध्ये भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. ते त्यांच्या कुटुंबीयासह भलस्वा डेअरी परिसरात वास्तव्याला आहेत. वृंदावन यांनी असलम नावाच्या या जमिनीचे व्यवहार करणाऱ्या दलालाकडून 14 लाख रुपयांचा एक प्लॉट भलस्वा परिसरात खरेदी केला होता. मात्र, असलम त्यांना त्यांच्या प्लॉटचा ताबा देत नाव्हता आणि पैसे परत द्यायला तयार नव्हता.