नवी दिल्ली - 'इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नुसार लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरून 51व्या स्थानावर आला आहे. त्यावरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'खरे तर सत्तेमध्ये असलेले लोकच तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत', असे चिदंबरम म्हणाले.
लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय घटनांवर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हे लक्षात येईल की, लोकशाही आणि लोकशाहीतील संस्थांना शक्तीहीन करण्यात आले आहे. सत्तेमध्ये असलेले लोकच तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत. ज्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल पाहून प्रत्येक भारतीयाला चिंता करण्याची गरज आहे, असे चिंदबरम यांनी टि्वटमध्ये म्हणाले.