रांची -पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आलेले असताना धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 28 परदेशी नागरिकांविरोधात झारखंड सरकार कडक कारवाई करणार आहे. क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे झारखंड राज्याचे पोलीस महासंचालक एम. व्ही राव यांनी सांगितले आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितेल. 28 परदेशी नागरिकांविरोधात राज्य सरकारने गुन्हाही दाखल केला आहे. पर्यटन व्हिसावर भारतात येऊन धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणे हे नियमांचे उल्लंघन असून अशा व्यक्तींची नावे काळ्या यादीत टाकण्यात येतील, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे.