नवी दिल्ली - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच ५ जून ते ३१ सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस
आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. दरवर्षी हवामान विभागाकडून लाँग रेन फारकास्ट जारी करण्यात येतो. त्याद्वारेच ही माहिती देण्यात आली.
आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. सध्या अवघा देश करोना नावाच्या संकटाशी लढतो आहे. अशात हवामान खात्याने दिलेली बातमी ही काहीशी दिलासा देणारी आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी मान्सून फारच उशिरा आला होता. त्यामुळे पेरणीसाठी देखील उशिर झाला होता. मात्र, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे परतीचा काळ देखील लांबला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. आता मान्सूनचा पाऊस सरासरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.