हैदराबाद - तेलंगाणामधील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर प्लास्टिकविरोधी लढा देत आहे आणि त्याच्या या लढ्याला आता बऱ्यापैकी यशही मिळताना दिसत आहे. आपल्या शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी त्याने 'प्लांट फॉर प्लास्टिक' अभियान सुरू केले आहे. यामध्ये तो लोकांना प्लास्टिकच्या बदल्यात झाडाचे एक रोपटे देतो. दोसापती रामू, असे या अभियंत्याचे नाव आहे.
या अभियानासाठी पूर्व गोदावरी कडिया वरून हजारो रोपटी आणली गेली आहेत. कितीही प्लास्टिक आणून त्या बदल्यात तुम्ही यातील एक रोपटे घेऊन जाऊ शकता. कारण रामूने अमूक-अमूक प्रमाणातच प्लास्टिक आणावे अशी कोणतीही अट ठेवली नाही. खरंतर तुम्ही केवळ एका चिप्सच्या पाकिटाच्या बदल्यातही एक रोपटे घेऊन जाऊ शकता. हे गोळा केलेले प्लास्टिक तो नंतर स्वखर्चाने हैदराबाद महानगरपालिकेमध्ये जमा करतो.