बंगळुरु (कर्नाटक) - सध्या कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. नागरिकांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे प्राण्यांचीही अन्नपाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. अशा परिस्थितीत बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनिअरने तब्बल १२०० भटक्या प्राण्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.
भटक्या प्राण्यांसाठी बंगळुरुच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा अनोखा उपक्रम - karnataka
लॉकडाऊन असल्यामुळे प्राण्यांचीही अन्नपाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. अशा परिस्थितीत बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर रेखा मोहन यांनी तब्बल १२०० भटक्या प्राण्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.
भटक्या प्राण्यांसाठी बंगळुरुच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा अनोखा उपक्रम
सॉफ्टवेअर इंजिनिअर रेखा मोहन यांनी त्यांच्या हॅप्पी फाल्स फॉऊंडेशन अंतर्गत जवळपास १२०० भटके कुत्रे तसेच इतर भटक्या प्राण्यांना आसरा दिला आहे. त्या दररोज ७५ किलो भात आणि ६० किलो चिकन शिजवून या भटक्या प्राण्यांना खाऊ घालतात. यासाठी त्यांना दररोज ५००० इतका खर्च येतो. त्यांचा हा उपक्रम पाहून इतर प्राणीप्रेमी देखील त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
याबाबत रेखा मोहन यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.