नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर तणाव असून चर्चेद्वारे वाद मिटविण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी चुशूल येथे भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान कमांडर पातळीवर बैठक पार पडली. ही बैठक तब्बल 12 तास सुरू होती, अशी माहिती आहे. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं. तर चीनच्या वतीने मेजर जनरल लियू लिन हे होते.
भारत-चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा, 12 तास चालली बैठक
भारत-चीन सिमेवर तणाव असून चर्चेद्वारे वाद मिटविण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी चुशूल येथे भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान कमांडर पातळीवर बैठक पार पडली.
बैठकची ही तिसरी फेरी होती. पहिल्या दोन बैठका ह्या चीनच्या हद्दीतीलत मोल्दो येथे झाल्या होत्या. 22 जूनला झालेल्या लष्कराच्या कमांडर-स्तरावरील चर्चेच्या बैठकीत भारताने चीनला सैन्या मागे घ्या, असं सांगितलं होतं. ही बैठकही 11 तास चालली होती.
यापूर्वी कमांडर पातळीवर 6 जून ला झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यामधून आपलं सैन्य मागे घेण्याचे मान्य केलं होतं. पण चीनने दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. त्यावर भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं की चीन 4 मे आधी ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी चीनने परत जावं. मात्र, चीनने भारताच्या प्रस्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.