महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तृतीयपंथीयाची निवड - ncp women's winpuneg

आगामी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते चांदणी गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

चांदणी गोरे

By

Published : Mar 1, 2019, 5:01 PM IST

पुणे - शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रथमच एका तृतीयपंथीयाची निवड करण्यात आली. पुण्यातील तृतीयपंथी चांदणी गोरे यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुण्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. शुक्रवारी ही नियुक्ती करण्यात आली. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते चांदणी गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, निरीक्षक रजनी पाचंगे, कालिंदी गोडांबे, तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित होत्या.


यावेळी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही चांदणी गोरे यांची महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली.

ABOUT THE AUTHOR

...view details