महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील २१ विमानतळांवर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता या विमानतळांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

corona
केरळमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

By

Published : Feb 3, 2020, 12:44 PM IST

तिरूवअनंतपूरम - केरळच्या कासरगोडमध्ये एका व्यक्तीला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती, राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलेजा यांनी दिली. या घटनेमुळे केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.

हेही वाचा - प्लास्टिकमुक्त गाव करणारी केरळमधील 'हरित कर्म सेना'..

खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील २१ विमानतळांवर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याआधी देशातील काही विमानतळांवर अशा प्रकारचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले होते. आता या विमानतळांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा - जळगावात एकाच कुटुंबातील १० जणांचा आपघाती मृत्यू , मुलीचे रिसेप्शन आटोपून परतत होते घरी

चीननंतर केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानंतर देशभरात दहशत पसरली आहे. या रुग्णांवर विशेष विभागात उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणुच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत ३६१ जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details