महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पाकिस्तान आपल्याच लोकांशी खोटे बोलतोय' - Pakistan

'पाकिस्तान हा निकाल त्यांच्या बाजूने लागला असल्याचा दावा करत आहे. पाकिस्तान आपल्याच लोकांशी खोटे बोलत आहे. कदाचित ही त्यांची कमजोरी असेल', असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.

रवीश कुमार

By

Published : Jul 18, 2019, 5:51 PM IST

नवी दिल्ली -कुलभूषण जाधव प्रकरणी द हेगमधील आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल बुधवारी भारताच्या बाजूने लागला आहे. 'पाकिस्तान हा निकाल त्यांच्या बाजूने लागला असल्याचा दावा करत आहे. पाकिस्तान आपल्याच लोकांशी खोटे बोलत आहे. कदाचित ही त्यांची कमजोरी असेल', असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.


'पाकिस्तान हा चुकीचा निकाल वाचत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा (ICJ) निकाल हा 42 पानांचा आहे. जर पाकिस्तानकडे 42 पान वाचायला धैर्य नसेल तर त्यांनी प्रेस नोट वाचावे , त्यातील प्रत्येक मुद्दा भारताच्या बाजूचा आहे, असा टोला रवीश कुमार यांनी पाकिस्तानला लगावला आहे.


पाकिस्तानकडे कोणताच पर्याय नाहीये. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल हा अंतीम असतो. तो पाकिस्तानला बंधनकारक आहे. यावर कोणतीच याचिका दाखल होऊ शकत नाही, असे रवीश कुमार म्हणाले आहेत.


'कुलभूषण हे पाकिस्तानमध्येच राहणार आहेत, त्यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसारच वागणूक दिली जाणार आहे. हा पाकिस्तानचा विजय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे (ICJ) भारत कुलभूषण यांची सुटका मागत होता. मात्र त्यांची मागणी अमान्य झाली आहे', असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details