इडुक्की(केरळ) -केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील थेवारम मेट्टु हा परिसर नयनरम्य डोंगराळ भाग असल्याने पर्यटक आणि प्रवाशांचे लक्ष वेधून घेतोय. केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या डोंगराळ भागातून दूरवर पसरलेल्या शेतीचे दिसणारे दृश्य मन मोहून टाकते. टेक्कडी आणि मुन्नार येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक थेवारममधील निसर्गसौंदर्याबद्दल ऐकून इथेही भेट देतात. या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना आशा आहे की, नेदुमकंदम, थेवारम मेट्टु आणि थेवारम यांना जोडणारा लिंक रोड तयार झाल्यास इथल्या पर्यटनावर देखील सकारात्मक परिणाम होईल.
पर्यटकांचे लक्ष वेधणारे पर्यटनस्थळ, थेवारम मेट्टु ! - थेवारम मेट्टु नयनरम्य डोंगराळ भाग
केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील थेवारम मेट्टु हा परिसर नयनरम्य डोंगराळ भाग असल्याने पर्यटक आणि प्रवाशांचे लक्ष वेधून घेतोय. केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या तेवाराम मेट्टु, रामकाळ मेडू, चथुरंगप्पारा, थुवाल, कैलासपारा या पर्यटनस्थळांना तामिळनाडूशी जोडणारा रस्ता बांधल्यानंतर चालना मिळेल आणि विकास होईल.
पर्यटकांचे लक्ष वेधणारे पर्यटनस्थळ, थेवारम मेट्टु
रस्ता बांधणीचा फायदा होणार
थेवारम हा तामिळनाडूतील पर्वत रांगांना जोडणारा मार्ग आहे. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्याचे पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणी करण्याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिता मिळत आहे. केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या तेवाराम मेट्टु, रामकाळ मेडू, चथुरंगप्पारा, थुवाल, कैलासपारा या पर्यटनस्थळांना तामिळनाडूशी जोडणारा रस्ता बांधल्यानंतर पर्यटनाला चालना मिळेल आणि विकास होईल.