महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सुरक्षेचा भंग करत प्रियांका गांधींना भेटण्यास स्टेजवर पोहचला कार्यकर्ता' - प्रियंका गांधींच्या सुरक्षेचा भंग

काँग्रेस पक्षाच्या १३५ वा स्थापना दिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी एक कार्यकर्ता सुरक्षा कवच तोडून स्टेजवर पोहचला.

'सुरक्षेचा भंग करत प्रियंका गांधींना भेटण्यास स्टेजवर पोहचला कार्यकर्ता'
'सुरक्षेचा भंग करत प्रियंका गांधींना भेटण्यास स्टेजवर पोहचला कार्यकर्ता'

By

Published : Dec 28, 2019, 9:47 PM IST

Updated : Dec 28, 2019, 10:30 PM IST

लखनौ - काँग्रेस पक्षाच्या १३५ वा स्थापना दिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी एक कार्यकर्ता सुरक्षा कवच तोडून स्टेजवर पोहचला. गुरमीत सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

'सुरक्षेचा भंग करत प्रियांका गांधींना भेटण्यास स्टेजवर पोहचला कार्यकर्ता'

माझ्याकडे कोणतेच पद नसून गेल्या 15 वर्षांपासून मी पक्षासाठी काम करत आहे. त्यांनी मला पक्षात एखादे पद देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. मी त्यांना पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी सुरक्षेचा भंग केला नाही. स्टेजवर जाण्यापूर्वी मी प्रियांका गांधी यांना अभिवादन केले आणि आमचा फोटो दाखविला. त्यावर त्यांनी मला स्टेजवर बोलावले, असे गुरमीत यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख अजय कुमार आणि सुरक्षा रक्षकांनी गुरमीत यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रियांका गांधी यांनी हात दाखवत त्यांना थांबवले.

हेही वाचा -महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझा गळा पकडला' प्रियंका गांधींचा आरोप

नुकतचं गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांची सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा प्रकार लोधी इस्टेट भागातील त्यांच्या घरात घडला होता. सातजण एका मोटारीत बसून या घराच्या पोर्चपर्यंत गेले, तेथे खाली उतरले आणि प्रियांका यांना भेटून त्यांना छायाचित्र काढण्यासाठी विनंती केल्याची माहिती आहे. २६ नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेच्या संदर्भात प्रियांका यांच्या कार्यालयाने सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीचा मुद्दा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) उपस्थित केला होता.

Last Updated : Dec 28, 2019, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details