जयपूर -राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील एका अभियंत्याने एक असा मास्क तयार केला आहे, की जो डॉक्टर आणि पोलिसांच्या पसंतीस उतरत आहे. याची किंमत केवळ 30 रुपए ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक युवक नवीन सुमनने फेस शिल्ड हा मास्क तयार केला है. आतापर्यंत या मास्कची दीड लाखहून अधिक ऑनलाईन ऑर्डर बुक करण्यात आली आहेत. हे नवीन मास्क कोरोनाविरोधात लढणाऱ्यांसाठी नि:शुल्क देत आहे.
नवीन मागील दहा दिवसांपासून हे मास्क बनवायचा काम करत आहे. रोज अपल्या घरी भावासह हे मास्क बनवतो. समाजसेवक भरत शर्मा आणि महमूद अली ही हे मास्क बनिवण्यासाठी नवीन सुमनची मदच करत आहेत. यासाठी नवीन सुमन ओएचसी, पीईटी शिट्सचा वारत करत आहे. त्यानंतर फॉर्म, टेप, इलास्टिकचा वापर करुन हे मास्क तयार करण्यात येतो. याला तयार करण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा वेळ लागतो. आत्तपर्यंत 1 हजारांहून अधिक मास्क नवीनने आपल्या चमूसह तयार केले आहेत.
नवीन सुमनने समाज माध्यमांवर मास्कबााबत माहिती दिली. त्यानंतर कोलकाता, कोटा आर्मी, जयपूर, केरळ, जयपूर सवाई मानसिंह रुग्णालयातून मास्कचे ऑर्डर आले आहेत. आत्तापर्यंत दिड लाखाहून अधिक मास्कचे ऑर्डर मिळाले आहेत.