अमरावती (आंध्र प्रदेश) -श्रीकाकुलम जिल्ह्यातील एरामुक्कम गावात गावकऱ्यांनी एका अस्वलाला पिंजऱ्यात पकडले. या गावात अस्वलांचे वारंवार हल्ले होत होते. यात काही गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला तर काही गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्रासलेल्या गावकऱ्यांनी स्वत: च एक लोखंडी पिंजरा करून लावला. या पिंजऱ्यात आज अस्वल अडकले.
गावकऱ्यांनीच केले अस्वलाला पिंजऱ्यात कैद; आंध्र प्रदेशातील एरामुक्कम गावची घटना - एरामुक्कम अस्वल न्यूज
श्रीकाकुलम जिल्ह्यातील एरामुक्कम गावात अस्वलांचे वारंवार हल्ले होतात. याबाबत वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे गावातील तरूणांनीच दहा दिवसांपूर्वी एक लोखंडी पिंजरा तयार करून लावला.
अस्वल
गावकऱ्यांनी अस्वलांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे गावातील तरुणांनीच दहा दिवसांपूर्वी एक लोखंडी पिंजरा तयार करून लावला. या पिंजऱ्यात अस्वल अडकल्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली.