महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्राचीन काळापासून 'सोशल डिस्टन्सिंग' पाळणारे गाव! - पाई गाव

उदयपुरपासून ३५ किमी अंतरावर 'पाई' हे गाव आहे. या गावात पूर्वीपासून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. गावातील घरांची रचानाही अंतर ठेवूनच करण्यात आलेली आहे. दोन घरांदरम्यान कमीतकमी ३० मीटर आणि जास्तीतजास्त १०० मीटर अंतर आहे.

social distance
सोशल डिस्टन्सिंग

By

Published : Apr 18, 2020, 8:54 AM IST

Updated : Apr 18, 2020, 9:09 AM IST

जयपूर -कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. राजस्थानमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, उदयपुरच्या जवळ असे एक गाव आहे जेथे अनेक वर्षांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळूनच सर्व व्यवहार केले जातात.

उदयपुरपासून ३५ किमी अंतरावर 'पाई' हे गाव आहे. या गावात पूर्वीपासून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. गावातील घरांची रचानाही अंतर ठेवूनच करण्यात आलेली आहे. दोन घरांदरम्यान कमीतकमी ३० मीटर आणि जास्तीतजास्त १०० मीटर अंतर आहे.

येथील पूर्वजांचे म्हणेने होते की, दूर राहिल्याने प्रेम आणि सलोखा वाढतो. शेजारी-पाजाऱ्यांचे वाद होत नाहीत. त्यामुळे येथे पहिल्यापासूनच एकमेकांपासू दूर राहूनच सगळे व्यवहार केले जातात. आता देशभरात कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा आग्रह केला जात आहे. नागरिकांना हे कठीण जात आहे. मात्र, या गावातील नागरिक आरामात आपली दैनंदिन कामे करत आहेत.

पाई गावाप्रमाणेच राजस्थानमधील अनेक आदिवासी बहुल गावांमध्ये अशाच परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्यामुळेच राजस्थानमधील अतिग्रामीण भागात कोरोना पोहचलेला नाही.

Last Updated : Apr 18, 2020, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details