महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

..तर कुपोषणमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे खरे परिणाम दिसतील! - भारत कुपोषण परिणाम लेख

या लेखामध्ये श्वेता खंडेलवाल या भारतातील कुपोषणाच्या परिस्थितीचा आढावा घेत, ते कमी करण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे याबाबत चर्चा करत आहेत. श्वेता या पोषण आहार संशोधन प्रमुख आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठानमध्ये अतिरिक्त प्राध्यापक आहेत.

The real 'EFFECT' on multiple forms of malnutrition in India
..तर कुपोषणमुक्तीसाठीच्या प्रयत्नांचे खरे परिणाम दिसतील!

By

Published : Feb 23, 2020, 8:12 PM IST

कुपोषणाबाबतच्या अगदी ताज्या पाहण्यांमध्ये (एनएफएचएस-४, सीएनएनएस आदी) अजूनही भारतावरील कुपोषणाचे मोठे ओझे (१७ टक्के बेसुमार वाढ, ३५ टक्के योग्य वाढ न होणे, आणि ३३ टक्के वाजवीपेक्षा कमी वजन) आणि स्थूलपणा तसेच लठ्ठपणाचे वाढते ओझे तसेच असल्याचे दिसले आहे. अशा वेळेला ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सॅनारो यांना ७१ व्या प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केल्याचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. यामुळे पोषणविषयक काम करणारा समुदाय उत्साहित झाला होता. कारण गेल्या चार दशकांत योग्य वाढ न झालेल्या मुलांचे प्रमाण ५५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात ब्राझिल हा सर्वोत्कृष्ट राहिला आहे. याशिवाय, ज्या वेगाने योग्य वाढ न झालेल्या मुलांची संख्या घसरत आहे, तो वेग ब्राझीलने कायम ठेवला आहे.

ब्राझिल हे कसे करू शकला? ब्राझिलने सर्वप्रथम मुलांची योग्य प्रकारे वाढ न होण्याच्या मूलगामी कारणांचे विश्लेषण केले. यासाठी जे मुख्य घटक निश्चित करण्यात आले, ते अन्नाची अपुरी उपलब्धता, मुले आणि महिलांची पुरेशी काळजी न घेणे, अपुऱ्या आरोग्य सेवा आणि धोकादायक पर्यावरण हे होते. हे घटक धोक्याची घंटा वाजवणारे आहेत का? अर्थातच! भारतातही हेच चिंतेचे मुद्दे मोठ्या प्रमाणावर सामायिक आहेत. आता, इतर देशांकडून उपाययोजना किंवा सभोवतालची परिस्थिती जशीच्या तशी उचलणे आणि ती आपल्या भूप्रदेशात लागू करणे हे काही सहज करण्यासारखे होणार नाही. नुसते त्यांच्या उपायांची नक्कल करून, ते जसेच्या तसे लागू करणे हे धोरण निराश करणारे ठरू शकते. उलट त्यांच्या उपायांचे विचारपूर्वक संदर्भीकरण हे जास्त सहाय्यकारी होऊ शकेल.

या लेखातून मला काय हवे आहे? नवीन काही नाही- केवळ अधिक अधिकार आणि सरकारच्या कुपोषणमुक्त भारत २०२२ दृष्टिकोनाच्या आवाक्याची व्याप्ती वाढवणे, ज्यामुळे सर्व स्वरूपातील कुपोषण कायमचे फेकून देता येईल. ज्या क्षेत्रात कुपोषणाच्या विविध स्वरूपांशी सामना करण्यासाठी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते अधिक व्यापक करून त्यांची गति वाढवण्यासाठी (खरे परिणाम) ज्या क्षेत्रांमध्ये धोरण मजबूत करण्याची गरज आहे, ते मी प्रस्तावित करत आहे.

  • प्रमाण - तातडीने कृती करण्यासाठी उच्च दर्जाची, अचूक डेटा निर्मिती करणारी साधने, तंत्र आणि तंत्रज्ञान यावर फोकस करणे. या उपाययोजनेला पूरक परिणामकारक देखरेख आणि मूल्यमापन प्रक्रियेची आणि योग्य दिशेने कृतीचा वेग वाढवण्यासाठी मदत करण्याची गरज आहे.
  • अन्न व्यवस्था - आरोग्यसंपन्न लोकसंख्येसाठी हा सर्वात महत्वाचा दुवा आहे. सध्याची अन्न प्रणाली ही अनारोग्यास सहाय्यकारी ठरणारे उच्च प्रमाणातील फॅट्स, साखर आणि मिठाचे पदार्थ सेवन वाढत्या प्रमाणात करण्यास उत्तेजन देणारी आहे. वैविध्यपूर्ण, ताज्या, त्या त्या मोसमातील आणि स्थानिक उपलब्ध असलेली धान्ये, भाजीपाला आणि फळांनी तयार केलेली घरी शिजवलेले जेवण या सर्वाची ती पायमल्ली करत आहे. आमच्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात सहसा खाद्यपदार्थांमध्ये नसलेली पोषक तत्वे ज्यामध्ये आहेत अशी धान्या आणि कच्च्या भाज्या वगैरेंचा उपयोग करण्यावर जोर दिला गेला आहे. ज्यामुळे सूक्ष्मपोषक कमतरतांना आळा घातला जाऊ शकेल आणि आमच्या विशेषतः तरूण पिढीने एतद्देशीय पारंपरिक खाद्यपदार्थांचा उपयोग केला तर आमच्या घरांमध्ये आणि ताटात दररोज वैविध्यपूर्ण भारतीय खाद्यपदार्थ पुन्हा आणण्यात फार मोठी मदत होईल.
  • वित्तपुरवठा - पैशाशिवाय तर काहीही होऊ शकत नाही. सार्वजनिक आरोग्य आणि पोषण आहारासाठी शाश्वत प्राधान्यीकृत निधीचा पुरवठा अत्यंत महत्वाचा तर आहेच, पण लोकांना खाद्यपदार्थांच्या बाबतीत आरोग्यसंपन्न पदार्थांची निवड करण्यास रेटा देणेही लाभदायक होईल. गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी तसेच लिंगभेद आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्घतीने तयार केलेली गरिबस्नेही सार्वजनिक धोरणांची आवश्यकता आहे. अधिक समान उत्पन्नाचे वाटप आणि आरोग्य आणि पोषण सेवेची उपलब्धता वाढवणे यांची खात्री करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत ज्यांनी वंचित घटकांचे दिवे खरोखरच उजळले आहेत. भ्रष्टाचार आणि उत्तरदायित्वाचा अभाव यामुळे ज्यांना लाभ होतो, अशा त्रुटी तातडीने निश्चित करून त्या तातडीने दूर केल्या पाहिजेत.
  • अनन्य स्तनपान आणि आयवायसीएफ (अर्भक आणि दोन वर्षांच्या आतील मुलांसाठी अन्नपुरवठा) पद्धती - सरकारकडून असलेल्या अपेक्षांची एकामागून एक गणना करता येईल, पण नवजात आणि दोन वर्षांच्या आतील मुलांना अन्न भरवण्यासाठी वैयक्तिक जबाबदारीचाही सकारात्मक परिणाम व्हायला हवा. अर्थातच बाह्य पर्यावरणात्मक घटक(कौटुंबिक घटक, सामाजिक-आर्थिक दर्जा, उपलब्धता आणि सोय, कामाची समर्थक धोरणे आदी) जे या पद्धतीला आकार देत असले तरीही, आमची दोन वर्षांखालील ७ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना अपुरे अन्न आणि पोषण आहार मिळतो, हे क्षम्य नाही. कुपोषण हे पूर्वीच्या दिवसात दृष्य नसायचे आणि त्यामुळे अनेक सेवा पुरवठादारांना आपण मुलांना अचूक घनता, वैविध्य, वारंवारता आणि प्रमाण असलेले पोषक द्रव्ये देत नाहीत, याची जाणीवच नसायची.

आमच्या समाजात, एकमात्र स्तनपान हे खूप लवकर संपुष्टात येते आणि योग्य पूरक पोषक अन्न देणे खूप उशिरा सुरू होते. स्वच्छ जेवण तयार करणे, स्वच्छ सभोवताल आणि वेळेवर लसीकरण हेही संसर्गाची वारंवार लागण रोखण्यास महत्वाचे आहेत. पहिल्या १००० दिवसांमध्ये झालेले नुकसान (विशेषतः एकंदरीत वाढ आणि मेंदूचा विकास) मोठ्या प्रमाणावर भरून काढता येत नाही, हे आपल्या सर्वांना माहित आहे. अन्न भरवण्याच्या या अवकाशात आम्ही भूक आणि कुपोषण यांचे निर्मूलन करण्यासाठी लघुदृष्टी असलेले झटपट उपाय योजण्याचा प्रयत्न करतो, हा एक मुद्दा आहे. केवळ कडधान्यांचा वापर कमी करून(राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा) आणि कार्बोहायड्रेटसनी समृद्ध जेवण(घरी घेऊन जायचे धान्य, मध्यान्ह भोजन, अंगणवाडीतील जेवण) दिल्याने आम्ही अत्यंत तीव्र कुपोषित मुलांची संख्या कमी करू शकू, पण त्यांना असंसर्गजन्य रोगांचे त्वरित लक्ष्य बनण्याकडे ढकलत आहोत. लोकांना एका स्वरूपातील कुपोषणातून दुसर्या प्रकारच्या कुपोषणात आम्ही ढकलत नाही ना, याची सर्वोच्च सावधानता बाळगली पाहिजे. फळे, हिरव्या पानांच्या भाज्या, अंडी आणि डाळी ही आहारात वापरून काही राज्यांमध्ये सुधारणा दिसत आहे, पण याला निश्चितच गति दिली पाहिजे.

  • अभिसरण आणि क्षमता उभारणी - कुपोषणाचे कोडे सोडवण्यात पाणी, स्वच्छता, रोजगार, शिक्षण, जाहिरात, लसीकरण, कृषी, पर्यावरण आदी क्षेत्रांशी अभिसरण करण्याची मजबूत समग्र कृती केल्यास त्याचा पोषणावर परिणाम होणे हा प्रमुख उपाय आहे. अनेक अधिकारक्षेत्रे आणि क्षेत्रांमधील अनेक भागधारकांकडून एकात्मिक कृती घडण्यासाठी पोषणयुक्त आहार वास्तवात हुक म्हणून काम करतो. संयुक्त मालकीहक्क आणि उत्तरदायित्व, सुरळीत कृतीसाठी कालबद्घ पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि उदार श्रेयनिर्देश आणि लाभांश यांचीही फार मोठी मदत होऊ शकेल. क्षमतेतील कमतरतांशी सामना करण्यसाठी, रिक्त पदे भरणे, भरतीमध्ये उशिर टाळणे, योग्य वेळी बढत्या,कामगिरी उंचावण्यासाठी अल्पकालीन प्रशिक्षण हे सुरूवातीचे उपाय उपयुक्त ठरतील. सक्षम कर्मचारी एकत्र आल्यास मंथन करून स्थानिक प्रश्नांवर स्थानिक तोडगे तयार करेल, कर्मचार्यांना उच्च प्रेरित भावनेने ठेवणे, पुनरूक्ती असलेले काम टाळणे आणि अनेक लोकांना आघाडीवरच्या कर्मचार्यांचे उत्तरदायित्व याद्वारे व्यवस्थेतील उणिवांवर मात करू शकेल. अभ्यासांनी हे दर्शवले आहे की, एडब्ल्यूडब्ल्यूचा शालेयपूर्व शिक्षणासाठीचे समुपदेशनाचा वेळ दस्तऐवजीकरणाच्या कामामुळे (त्याच त्या नोंदी, अहवाल बनवणे आदी) लागणाऱ्या वेळेपेक्षा एक चतुर्थांश वेळ वाचतो.
  • सुधारित पोषण आहारासाठी प्रमाणाचे परिवर्तन कृतीत करण्याचे तंत्रज्ञान - सरकारी आणि वैयक्तिक पातळीवर पोषण आहारासारख्या क्षेत्रात द्रुतगतीने वृद्धी आणि विकास आणण्यात तंत्रज्ञान खरोखरच सहाय्यकारी ठरू शकते. एकीकडे, तंत्रज्ञान लोकांना चांगले आणि खात्रीशीर पर्याय निवडण्यास सक्षम करते; दुसरीकडे धोरणकर्त्यांना जनआंदोलन, सहभागी मालकीहक्क आदीचा उपयोग करून घेण्यासाठी सामाजिक समर्थनासाठी समाज माध्यमांचा अधिकार बहाल करते. आम्ही उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे-सक्षम उपाययोजना अनिवार्य आहे कारण त्यामुळे वर्तनात्मक बदलावर सकारात्मक परिणाम होतो. शाश्वत पद्घती किंवा समूहामध्ये जगण्याचा मार्ग म्हणून आधुनिक साधनांनी ज्ञानाचे कृतीत संक्रमण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. प्रयत्न योग्य दिशेने असतील तर लवकर अथवा उशिरा पण खरे परिणाम निश्चितच दिसतील. भारत हा अशा काही थोड्या देशांपैकी आहे, जे सर्व वयोगटातील लोकांसाठी तपशीलवार आणि वैविध्यपूर्ण सार्वजनिक पोषण आहाराच्या कार्यक्रम आणि धोरणांबद्दल गर्वाने सांगू शकतात. तरीसुद्धा सुधारित काटेकोर प्रक्रिया, सर्व भागधारकांनी सर्व प्रकारच्या कुपोषणाविरोधात कृती करण्यासाठी नवीकरणीय उर्जा देऊन त्यांना प्रेरित करणे, नाविन्यपूर्ण कल्पना आणि सामूहिक मजबुती यामुळे कुपोषणावर जोरदार प्रहार करणे शक्य होईल.

- श्वेता खंडेलवाल (पोषण आहार संशोधन प्रमुख आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठानमध्ये अतिरिक्त प्राध्यापक.) (लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

ABOUT THE AUTHOR

...view details