दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीनिर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली. बुधवारी चार दोषींपैकी विनयने राष्ट्रपतींकडे ही याचिका केली होती.
निर्भया प्रकरण : राष्ट्रपतींनी दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली - विनय शर्मा दया याचिका
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबविण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिका फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. त्यानंतर आता तिसरा दोषी असलेल्या विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.
हेही वाचा - 'गुन्हेगारांच्या वकिलांनी मला न्यायालयातच दिले खुले आव्हान.. फाशी होणारच नाही'
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबविण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिका फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. त्यानंतर आता तिसरा दोषी असलेल्या विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. हा अर्ज आज अखेर राष्ट्रपतींनी फेटाळला.