महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 20, 2020, 3:16 PM IST

ETV Bharat / bharat

'या' दिवशी उघडणार बद्रीनाथ अन् केदारनाथ मंदिराचे दरवाजे

बद्रीनाथ धामाचे दरवाजे येत्या 15 मे ला उघडण्यात येणार आहेत. पूजा-पाठ झाल्यानंतर दरवाजे उघडण्याचा दिनांक निश्चित करण्यात आला. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यानुसार येत्या 15 मेला ब्रह्म मुहूर्त असून सकाळी 04:30 ला भक्तांसाठी दरवाजे उघडण्यात येणार आहेत.

'या' दिवशी उघडणार बद्रिनाथ अन् केदारनाथ मंदिराचे दरवाजे
'या' दिवशी उघडणार बद्रिनाथ अन् केदारनाथ मंदिराचे दरवाजे

डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे येत्या 15 मे ला उघडण्यात येणार आहेत. पूजा-पाठ झाल्यानंतर दरवाजे उघडण्याचा दिनांक निश्चित करण्यात आला. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यानुसार येत्या 15 मे ला ब्रह्म मुहूर्त असून सकाळी 04:30 ला भक्तांसाठी दरवाजे उघडण्यात येणार आहेत. तसेच 14 मे ला केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनचा परिणाम चारधाम यात्रेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. कोरोनामुळे टॅक्सी चालक, हॉटेलवाले, व्यापारी आणि चारधाम यात्रेशी संबंधित स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारधाम यात्रेसाठी सर्व तयारी करण्यात येत असून कोरोना साथीच्या काळातही सरकार आवश्यक पावले उचलत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दरम्यान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत चारधाममध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.

ABOUT THE AUTHOR

...view details