डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे आज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर ०४:३० ला उघडण्यात आले. यावेळी पुजाऱ्यांसह फक्त 28 जणांनी बद्रीनाथ मंदिरातील अंखड ज्योतीचे दर्शन केले.
मंदिराचे दरवाजे उघडण्यावेळी मुख्य पुजारी आणि इतर पुजा स्थळांशी संबधीत 28 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली होती. यावेळी सर्वांनी सोशल डिस्टंन्स पाळला.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.
बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.