नवी दिल्ली - लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदभवनावर झालेल्या हल्ल्याला आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धाजंली अर्पण केली आहे.
13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी भारतीय लोकशाहीवर सर्वांत मोठा हल्ला झाला होता. भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 6 डिसेंबर 2002 ला मोहम्मद अफजल, शौकत हुसैन, अफसान आणि सय्यद अब्दुल रहमान गिलानी यांना दोषी ठरवण्यात आले होते. तर मोहम्मद अफजल याला 9 फेब्रुवारी 2013 ला दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी दिली होती.
असा आहे घटनाक्रम...
13 डिसेंबर 2001 सकाळी संसदेत हिवाळी सत्राचे कामकाज सुरू होते. त्यामुळे संसदेत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी इतर खासदार उपस्थित होते. कामकाज तहकूब झाल्यानंतर पंतप्रधान आणि सोनिया गांधी निघून गेले. तर उपराष्ट्रपती कृष्णकांत गेट क्रमांक 12 मधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते.
यावेळी एक पांढर्या रंगाची अॅम्बेसिडर कार वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचे सुरक्षाक्रर्मीने पाहिले आणि गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी पुढे जात उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकली आणि अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. दरम्यान संसद परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण झालं. नक्की काय घडलंय हे कुणालाच समजत नव्हतं. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे संसद परिसराला युध्दाचं रूप आले होते.
हा दहशतवादी हल्ला असल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षाकर्मींनी प्रसंगावधान दाखवत संसदेचे सर्व गेट बंद केले. 3 अतिरेकी सुरक्षा कर्मचार्यांनी ठार केले. तर चौथा अतिरेकी ग्रेनेड फेकत होता. त्याला गोळ्या झाडून सुरक्षाकर्मींनी जागीच गारद केले. अंगावर स्फोटके असलेला अतिरेकी संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी गोळी झाडली. गोळी स्फोटकांवर लागल्याने त्याचा स्फोट होऊन तो ठार झाला.
सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली ही चकमक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू होती. त्यावेळी सभागृहामध्ये तत्कालीन पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह 100 पेक्षा जास्त खासदार उपस्थित होते. सुरक्षारक्षकांनी मोठ्या धैर्यांने अतिरेक्यांचा सामना केला होता. या हल्ल्याप्रकरणी 6 डिसेंबर 2002 ला मोहम्मद अफजलला फाशी देण्यात आली. अफझल गुरूच्या फाशीने या शहिदांना खर्या अर्थाने श्रध्दांजली मिळाली.