नवी दिल्ली - तेजस विमानाच्या नौदल आवृत्तीने आज(11 जानेवारी) आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजावर यशस्वी लँडींग केले आहे. ही घटना लढाऊ विमानांच्या विकासामध्ये मैलाचा दगड मानली जात आहे. या विमानाच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला निवडक राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लढाऊ विमान विकास कार्यक्रमाच्या इतिहासात ही अत्यंत महत्वाची घटना असल्याचे, एका ट्विटद्वारे म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी तेजसच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना(डीआरडीओ)आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.