पोरबंदर (गुजरात) - 8 जूनपासून धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र राष्ट्रीय स्मारक उघडण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे गांधीजींचे जन्मस्थळ किर्ती मंदिर येत्या 30 जूनपर्यंत बंद राहील.
गांधीजीचे जन्मस्थळ कीर्ती मंदिर 30 जूनपर्यंत राहणार बंद - Corona update India
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारक उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे गांधीजींचे जन्मस्थळ किर्ती मंदिर येत्या 30 जूनपर्यंत बंद राहील.
गांधीजीचे जन्मस्थळ कीर्ती मंदिर 30 जूनपर्यंत राहणार बंद
राष्ट्रीय स्मारकाबद्दल केंद्र सरकारचे आदेश मिळाल्यानंतर ते भाविकांसाठी उघडण्यात येईल. मात्र या दरम्यान सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करणे तसेच केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पोरबंदरमधील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत सूचना अद्याप दिलेल्या नाही. जिल्ह्यातील भाविक आणि मंदिराचे ट्रस्टी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट बघत आहेत.