पटना- जेडीयूने १५ बंडखोर नेत्यांना ६ वर्षासाठी पक्षातून बाहेर काढले आहे. पक्षाविरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये या नेत्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने हे नेते नाराज होते. आता पक्षाने काढून टाकल्यानंतर यातील काही नेते इतर पक्षातून निवडणूक लढत आहेत. तर काही नेते इतर पक्षांना मदत करत असल्याचा आरोप होत आहे.