नवी दिल्ली -हिंदू संस्कृतीमुळेच मुस्लिमांना भारतामध्ये सुरक्षीत वाटते. आम्ही कुणाचाही द्वेष करत नसून संघाचा उद्देश्य फक्त हिंदु समाजाला नाही तर संपूर्ण देशाला संघटित करणे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. भूवनेश्वरमध्ये आयोजित संघाच्या सभेमध्ये ते बोलत होते.
समाजाला एकत्र करणे आवश्यक आहे आणि सर्व वर्गाने एकत्र यायला हवे आणि आरएसएस या दिशेने काम करत आहे. संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थानामध्ये विविधता असूनही भारतीय लोक स्वत:ला एक मानतात. या एकजुटीच्या अद्वितीय भावनेमुळे मुस्लीम, पारशी इत्यादी धर्मातील लोकांना देशात सुरक्षित वाटते. पारशी भारतात सुरक्षित आहेत आणि मुस्लीमही आनंदी आहेत, असे भागवत म्हणाले.
हेही वाचा -बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; अपहरणाच्या संशयातून महिलेला मारहाण करुन जिवंत जाळले