महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ईफ्फी' सोहळ्याची सांगता, ब्लँश हँरिसन दिग्दर्शित 'पार्टिकल' ठरला 'सुवर्ण मयूर'चा विजेता - the Best Film goes to the movie 'Particles'

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये या ५० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

The Golden Peacock Award for the Best Film goes to the movie 'Particles'
'ईफ्फी' सोहळ्याची सांगता, ब्लँश हँरिसन दिग्दर्शित 'पार्टिकल' ठरला 'सुवर्ण मयूर'चा विजेता

By

Published : Nov 29, 2019, 1:28 PM IST

पणजी -ब्लॉश हँरिसनचे दिग्दर्शन आणि इस्टेल फिएलॉन यांची निर्मिती असलेला 'पार्टिकल' चित्रपट ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याबरोबरच रोख रुपये ४० लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये या ५० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद, केंद्रीय माहिती खात्याचे सचिव अमित खरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - चाहत्याने प्रपोज केल्यानंतर भूमीच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन

जेलीकट्टू या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोश पेलिसरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. त्यांना चांदीचा मयूर आणि रुपये १५ लाख बक्षीस देण्यात आले. उषा जाधव यांना ' माइ घाट : क्राईम नं. १०३/२०१५ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर सेऊ जॉर्ज यांना 'मिरीघेला' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता असे पुरस्कार देण्यात आले.

चीनमधील ' बलून' स्पेशल ज्युरी पुरस्कार विजेता ठरला. अमिन सिदी बोऊमेडीनला दिग्दर्शन पदार्पण पुरस्कार मिळाला. ' हेल्लारो'साठी अभिषेक सहा यांना तर युनेस्को गाऔधी मेडलसाठी 'रवांडा' चित्रपटासाठी रिकार्डो सालवेट्टी यांना गौरविण्यात आले.

हेही वाचा -सलमानच्या नवीन गाण्यावरून वाद; ट्विटरवर ट्रेंड होतोय 'बॉयकॉट दबंग ३' हॅशटॅग

ABOUT THE AUTHOR

...view details