कोल्लम-केरळच्या कोल्लम शहरात सोड्याच्या नावाखाली चक्क व्होडका, फ्रुट बिअर आणि फ्रुट व्हिस्कीच्या फ्लेवरच्या सोड्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न सुरक्षा विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी कोल्लम शहरातील या दुकानावर छापा टाकला. विशेष म्हणजे हे दुकान शाळेच्या जवळ आहे.
केरळमध्ये सोड्याच्या नावाखाली चक्क व्होडका, फ्रुट बिअर, फ्रुट व्हिस्कीची विक्री?
विशेष म्हणजे हे सोड्याचे दुकान शाळेच्या जवळ आहे. या दुकानातून व्होडका, फ्रुट बिअर आणि फ्रुट व्हिस्की यांच्या गंधाच्या आणि चवीच्या सोड्याची विक्री केली जायची.
'प्लॅनेट सोडा' असे या सोड्याच्या दुकानाचे नाव आहे. या दुकानातून व्होडका, फ्रुट बिअर आणि फ्रुट व्हिस्की यांच्या गंधाच्या आणि चवीच्या सोड्याची विक्री केली जायची. याबाबत पालकांनी अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाच्या पथकाने या दुकानाची तपासणी केली. मात्र, त्यांना प्राथमिक तपासणीमध्ये सोड्यामध्ये अल्कोहोल आढळली नाही.
अन्न सुरक्षा कायद्यान्वये परकीय द्रव्यांच्या नावाखाली सोड्याची विक्री करता येत नाही. सदरील दुकान हे विना परवाना चालत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, दुकान मालक गिरीश याने हे दुकन अधिकृत असून सोड्यात दारू नसल्याचे सांगितले. तसेच त्याने द्रव्यांची नावे बदलणार असल्याचेही सांगितले.