जोधपूर -शहरातील सर्वात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या परिवाराचे सर्व सदस्या सोमवारी कोरोनाशी यशस्वी लढा देऊन घरी परतले. यावेळी या सर्व परिवाराचे शेजारील नागरिक आणि नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले. 22 मार्च रोजी टर्की येथून परतलेल्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर कुटुंबातील इतर दोन व्यक्तींना देखील कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
'कोरोना'ला हरवून घरी परतलेल्या कुटुंबीयांचे शेजारच्यांनी केले जोरदार स्वागत हेही वाचा...'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप
या सर्व सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी त्या सर्वांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी ते राहत असलेल्या त्यांच्या घराशेजारील सर्व नागरिकांनी थाळी वाजवून आणि टाळ्या वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. असे असले तरिही डॉक्टरांनी या सर्व सदस्यांना पुढील चौदाल दिवस होम क्वारंटाऊन राहण्याचाच इशारा दिला आहे.
संपुर्ण परिवाराची कोरोनावर मात... कोरोनातून मुक्त झालेल्या घरातील या सर्व सदस्यांसोबत बातचीत केली असता त्यांनी, आपण डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या उपचारामुळेच बरे झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढेही डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करणार असल्याचे सांगितले आहे.