हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी SIT गठीत, टीमचं नेतृत्व 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे - डॉक्टर दिशा
27 नोव्हेबरच्या रात्री डॉ.दिशा यांच्यावर बलात्कार करून त्यांना खून करून जाळण्यात आले होते. त्यानंतर ४८ तासातच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशावुलू अशी आरोपींची नावे आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान शुक्रवार सकाळी साडेपाचच्या सुमारास बलात्कार झालेल्या घटनास्थळी पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या चकमकीत त्यांचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. आता त्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे.
हैदराबाद- डॉ. दिशा बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींचा ६ डिसेंबरच्या सकाळी एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी तेलंगाणा सरकारने विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली आहे. ८ सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व मराठमोळे पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भागवत हे रचकोंडाचे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. भागवत यांच्या नेतृत्वात हे पथक सायबराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करेल.
तेलंगाणा सरकारने २०१४ साली 'She teams' नावाने एक सिस्टीम सुरू केली, महेश भागवत यांनी रचकोंडा या नवीन आयुक्तालयाचा २०१६ मध्ये ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी she teams च्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात केली. मुली, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून त्यांनी उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी त्यांचे पोलीस पथक काम करते. महेश भागवत यांचे मानव तस्करी विरोधातही मोठे कार्य आहे. तसेच त्यांनी बाल मजुरीविरोधातही कारवाया करत अनेक बाल कामगारांची सुटका केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वात एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी होणार आहे.
डॉ. दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणाची आज तेंलगाणा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, एन्काऊंटरनंतर ४ ही आरोपींचे तेलंगाणा उच्च न्यायालयाने याआधीच हैदराबाद एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होऊपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी पाहणी केली. तर तेलंगाना पोलिसांनी त्या चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआईटीचे सदस्य या प्रकरणाशी संबंधीत साक्षीदारांच्या साक्ष घेतील. तसेच एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलिसांचीही चौकशीही करेल. या प्रकरणी मानवधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. त्यांनीही या शनिवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या सदस्यांनी शनिवारी मेहबुबनगरच्या सरकारी रुग्णालयासही भेट दिली. या ठिकाणी आरोपींचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण-