महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माणुसकीचा झरा : कोरोनाच्या संकटात 'या' दाम्पत्याची अशीही मदत, ३ लाखांचे भाडे केले माफ - संचारबंदी इफेक्

कोरोना विषाणूमुळे देशभरातील जनता संकटात सापडली आहे. तर, लॉकडाऊनचा तीव्र परिणाम लोकांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. या कठीण परिस्थितीत, हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील राजगडच्या एका दाम्पत्याने किरायाने दिलेल्या दुकानातील दुकानदारांकडून घेतले जाणारे महिन्याचे भाडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या कार्यामुळे दुकानदारांचे एक-दोन नव्हे तर, तब्बल ३ लाखांचे भाडे माफ झाल्याने दुकानदारांनाही संकटात मदत मिळाली आहे.

माणुसकीचा झरा
माणुसकीचा झरा

By

Published : Apr 24, 2020, 1:10 PM IST

नाहन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले, कित्येकांचा रोजगार हिरावला आहे. लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या परिस्थितीत शासनासह काही संस्था, नागरिक पुढे येऊन गरजुंना मदत करत आहेत. अशातच हिमाचल प्रदेशच्या नाहन येथील एका दाम्पत्याने त्यांच्या किरायादारांचे हजार नव्हे, तर लाखो रुपयांचे भाडे माफ केले आहे.

माणुसकीचा झरा

सिरमौर जिल्ह्यातील राजगढ क्षेत्रात राजेंद्र ठाकूर यांचे कुटूंब राहत आहे. त्यांची राजगढच्या मुख्य बाजारात ४० दुकाने किरायाने आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे ही सगळी दुकाने बंद असून व्यापारी वर्गाला होणारे नुकसान लक्षात घेता त्यांनी त्यांची प्रत्यक्ष मदत करण्याचे ठरविले. मात्र, मदत कशाप्रकारे करायची याचा विचार करत असतानाच त्यांना एक युक्ती सुचली. राजेंद्र आणि त्यांच्या पत्नीने या ४० दुकानातील दुकानदारांचे एक-दोन नव्हे तर तब्बल ३ लाख रुपयांचे भाडे न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे, व्यापारीवर्गालाही आधार मिळाला आहे.

राजेंद्र याबाबत सांगताना म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आधीच राज्यासह देशाची आर्थिक स्थिती बिघडत आहे. राजगढमध्येही व्यापाऱ्यांची दुकाने बंद पडल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्यापरिने शक्य होईल, तितकी मदत करण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार, परिस्थिती बघता आम्ही दुकानदारांकडून यावेळेसचे भाडे न घेण्याचा निर्णय घेतला. तर, कोरोनामुळे देशावर आलेले संकट आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या यंत्रणेला, प्रशासनाला धन्यवाद करतो आणि देशाचा सुजान नागरिक म्हणून या संकटघडीला शक्य तशी मदत करील, असेही भाव राजेंद्र यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details