नवी दिल्ली - रामाचा रावणावर आणि दुर्गेच्या महिशासुरावरचा विजय म्हणजे विजयादशमी. विजयादशमीच्या मुहूर्तावर लंकापती रावणाचे दहन केले जाते. यंदा चंदीगड येथे तब्बल २२१ फुट उंचीच्या रावणाचा पुतळा बनवण्यात येत आहे. हा देशातील सर्वात उंच पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.
विजयादशमी : चंदीगडमध्ये होणार देशातील सर्वांत मोठ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन - Ravanll be burnt in Chandigarh
यंदा चंदीगड येथे तब्बल २२१ फुट उंचीच्या रावणाचा पुतळा बनवण्यात येत आहे. हा देशातील सर्वात उंच पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.
पुतळा बनवण्यासाठी तब्बल ४० कारागीर काम करत आहे. पुतळ्याची उंची २२१ फूट तर रावणाच्या हाताची आणि तलवारीची उंची ५५ फूट असणार आहे. या पुतळ्याचे वजन २ क्विंटल असून विजयादशमीच्या दिनी रिमोट कंट्रोलद्वारे रावणाला दहन केले जाणार आहे. साधारण ३० लाख रुपये खर्च करून बनवण्यात येत असलेल्या या पुतळ्यामध्ये इकोफ्रेंडली फटाके बसवण्यात आले आहेत. हा पुतळा २ ऑक्टोबर रोजी धनास कॉलनीतील परेड ग्राऊंडमध्ये उभा केला जाणार आहे.
गेल्यावर्षी पंचकूला येथे जगातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. याची उंची २१० फुट असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. यासाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च करण्यात आला होता.