अहमदाबाद- आज जगभरातील सर्वच देशांनी दहशवादाच्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. दहशतवाद आणि हिंसेमुळे कोणालाच फायदा होणार नाही. भारत यापूर्वी पासूनच दहशतवादाविरोधात लढा देत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते गुजरात मध्ये केवडिया येथे सरदार वलसरदार यांच्या जयंती निमित्त अभिवादन केल्यानंतर संबोधन करत होते.
दहशवाद जागतिक समस्या-
गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशामध्ये जी परिस्थिती होत आहे. ज्या प्रकारे काही लोक दहशवाद्याचे समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे. ती आज एक जागतिक समस्या निर्माण झाली असल्याचे म्हणत पतप्रधान मोदींनी आज पाकिस्तानचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. आजच्या परिस्थिती जगभरातील सर्वच देश आणि तेथील सत्ताधारी, सर्व धर्म पंथांनी दहशवादाच्या विरोधात एकत्र होण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश तो स्वार्थ विसरला नाही-
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुलवामा हल्ल्याच्या घटनेबाबत बोलताना पाकिस्तानसह विरोधकांवरही निशाणा साधला. ज्यावेळी पुलवामा हल्ल्यात आपले वीर जवान शहीद झाले म्हणून देश दु:खात होता. त्यावेळी काही लोक त्यात सहभागी न होता राजकीय स्वार्थ साधण्याचे काम करत होते. त्यांना देश कधी विसरणार नसल्याचे म्हणत मोदींनी पुलवामा हल्ल्यावरून सरकारवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यावेळी कोणकोणते आऱोप करण्यात आले हे सर्व देश विसरला नसल्याचेही मोदी म्हणाले.