वनस्पतींच्या संरक्षणासाठी लक्ष वेधताना, झाडे सर्वोत्कृष्ट शिक्षक असून ती आम्हाला निस्वार्थीपणा आणि त्याग शिकवतात - जांधल्या पपय्याशास्त्री
सेवाभिमुख निस्वार्थी सहाय्य करण्याचे जीवंत उदाहरण जे कुणाला पाहायचे असेल तर, झाडाशिवाय दुसरे नाही. या ग्रहावर असलेला प्रत्येक सजीव, झाडे आपल्याला पुरवत असलेल्या प्राणवायूवरच जगत असतो आणि याबरोबरच फळे, पाने, औषधे, लाकूड आणि आमची इतर उपजीविकांवर मानवही जगत असतात. त्यामुळे पृथ्वीवर झाड नसेल तर जीवनाचे अस्तित्वच धोक्यात असेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. जीवनाच्या कोणत्याही स्वरुपाची आणि निसर्गाची युगानुयुगे चालत आलेले विधी आणि भावनांच्या माध्यमातून प्रार्थना करण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये भारत प्रथम आहे. तरीसुद्धा, जे देश झाडे तोडण्याच्या सर्वोच्च दराला सामोरे जात आहेत, त्या देशांच्या यादीत भारत सर्वोच्च स्थानी आहे, हे नमूद करणेही धोक्याचा इशारा आहे. आणखी पुढे, दरडोई वनस्पतींच्या सर्वात खालच्या दरामध्ये भारताचे नाव आहे. अशा टप्प्यात, ग्रीन इंडिया चँलेंज अशासारख्या संस्था असणे हा इश्वराचा कृपाप्रसादच आहे, जी संस्था काळाची गरज असल्याबाबत जागृती करत असून, त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी, राजकारणी, नोकरशहा, नामवंत लोक आणि सामान्य माणूस या समाजातील सर्व भागधारकांशी भागीदारी करून जागृती करत आहे.
जंगले धोक्यात..
भारतीय उपखंडात वैविध्यपूर्ण वातावरण असून ज्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभर विविध वनस्पती आणि प्राणीसंपदा यांची भेट देणारी जैवविविधता आहे. तरीसुद्धा, देशात नागरिकांच्या संख्येशी झाडांच्या संख्येची तुलना आपण करतो. तेव्हा घसरती संख्या पाहून दुःख होते. जगात सरासरी दरडोई झाडांची संख्या ४२२ असली तर भारतात मात्र ही संख्या प्रतिव्यक्ती २८ आहे. सर्वात निराश करणारी गोष्ट ही आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत, केवळ प्रति व्यक्ती चार झाडे ही स्थिती आहे.
संपूर्णपणे हरित आणि स्वच्छ शहरांच्या यादीत कॅनडा सर्वोच्च स्थानी असून, प्रति व्यक्ती, दरडोई वृक्षारोपण ८,९५३ आहे. यापाठोपाठ नंतर ४,४६१ वृक्षारोपणसह रशिया आणि ३,२६६ सह ऑस्ट्रेलिया आहे. दरडोई वृक्षारोपण यादीत इतका फरक का आहे, याची अनेक कारणे असून, सरकारने आणलेल्या धोरणांचे परिणाम, प्राचीन काळापासून असलेली हिरवळ, जनतेतील जागृती आणि जनतेचा सक्रीय सहभाग ही त्यापैकी काही कारणे असू शकतात. ही सर्व किंवा यापैकी बहुतेक कारणे भारतात दिसत नाहीत, जो दैनंदिन काळजीचा मुद्दा आहे, की झाडे तोडली जातात आणि नवीन झाड लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारे आपण देशात झाडांचे पतन आणि जंगलतोडीचा उच्च दर पाहत आहोत. जंगलतोड आणि वृक्षांचे पतन हा केवळ भारतासाठी चिंतेचा मुद्दा नाही तर सर्व जगभर उच्च दराने सुरू आहे.
अमेरिकन संशोधन संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, पृथ्वी एक हजार कोटी हेक्टर क्षेत्रावरील हिरव्या वृक्षांनी भरलेली असायला हवी. तरीसुद्धा, १९९० सालापासून, सुमारे १२.९ कोटी हेक्टर क्षेत्रातील वृक्षारोपण नष्ट झाले असून, वृक्षांची संख्या धोकादायक पद्धतीने ओसरत आहे. यासाठी विविध कारणे असून, त्यात लाकडाची तस्करी, चोरटी जंगलतोड, जंगली वणवे, औद्योगिकीकरण, शेती आणि लागवडीसाठी वनजमिन साफ करणे आणि इतर अनेक मानवनिर्मित चुका यांचा समावेश आहे. ९० कोटी लोक जंगलांवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.
विशेषतः, भारतात, आम्ही उच्च दराने वने गमावत आहोत. १९८८ च्या राष्ट्रीय वनधोरणानुसार, भारताची एक तृतियांश जमिनीचे जंगलासोबत सहअस्तित्व हवे. तरीसुद्धा, सध्याच्या घडीला, देशातील जंगलांनी व्याप्त जमीन एकूण व्याप्तीच्या फक्त २४.३९ टक्के आहे. २०१७ मध्ये भारतीय वन सर्व्हेक्षण संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार, वर्षावर्षाला जंगलतोड झपाट्याने वाढत आहे. आमच्या अगदी डोळ्यासमोर जंगले अतिशय वेगाने नष्ट होत आहेत. दोन्ही तेलगू राज्येही यास अपवाद नाहीत आणि वस्तुतः देशापेक्षा जास्त जंगल कमी होण्याच्या प्रमाणास सामोरे जात आहेत.
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद हिरवे वृक्षारोपण, तळी आणि इतर जलसंस्था यांच्यासह वैविध्यपूर्ण इकोसिस्टीमसाठी प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने, अगदी हे शहरसुद्धा आज जंगलतोडीच्या विळख्यात असून सातत्याने शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे, ६० टक्के झाडझाडोरा गमावला आहे. दुसऱ्या तेलगू राज्यातही हाच प्रकार असून, राज्यातील हिरवाई कमी होत असल्याच्या स्थितीत आहे. जंगलतोड ही केवळ दमा आणि इतर श्वसनाचे विकार आणते, एवढेच नव्हे तर मान्सूनचा मार्ग बदलण्यात आणि लागवड आणि कृषीवर तसेच वनस्पती आणि वन्यप्राण्यांच्या प्रजनन हंगामावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल हवामान बदल घडवण्यातील प्रमुख घटक आहेत. जंगलतोड आणि झाडझाडोरा नष्ट झाल्याच्या नकारात्मक परिणामांमुळे इकोसिस्टीममध्ये मोठा बिघाड होत आहे, ज्यामुळे त्यांच्याकडील वन्यप्राण्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात स्वतःच्या वस्तीतून बाहेर पडावे लागले आहे. अशा जंगलतोडीमुळे मानवजातीला भेडसावणारी प्राथमिक चिंता ही प्रामुख्याने पाऊस आणि पावसाच्या पाण्याची शेतीसाठी उपलब्धता ही असून, ज्याचा अंतिम परिणाम दुष्काळाने त्रस्त समाज आणि प्राण वाचवणारा प्राणवायूचा अभाव हा आहे.
असे म्हटले जाते की, पूर्ण वाढलेला वृक्ष आपल्याला २४ लाख रूपयांचा प्राणवायू पुरवतो आणि ०.५३ टन कार्बन डायऑक्साईड आणि १.९५ किलो इतर प्रदूषणकारी घटक शोषून घेतो.तो आपल्याला पृथ्वीच्या गाभ्यात असलेले १,४०० गँलन पावसाचे पाणी साठवण्यासही मदत करतो. एखाद्या आरोग्यसंपन्न व्यक्तीला दिवसभराचा लागणारा प्राणवायू तीन सिलिंडर आहे. या दराने, एखाद्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी प्राणवायुची गरज असेल तर, त्याने आपल्या आयुष्यात तीन वृक्ष लावून वाढवले पाहिजेत. मानव मैत्रीपूर्ण आणि सामाजिक म्हणून ओळखला जातो. तरीसुद्धा, मोठा प्रश्न हा आहे की, आमच्या अस्तित्वाचे स्त्रोत असलेल्या वृक्षांप्रति आम्ही किती मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारे आहोत?
सामूहिक जबाबदारी..