महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काळ आला होता मात्र... भूस्खलनातून 'तो' सुखरूप वाचला! पाहा व्हिडिओ - भूस्खलन

मल्ल्मपूर येथील भूस्खलनाची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काळ आला होता मात्र... अंगावर भूस्खलन कोसळून ही तो वाचला! पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 10, 2019, 8:09 PM IST

तिरुअंनतपूरम - केरळला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे भूस्खलन, दरड कोसळणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार सातत्याने घडायला लागले आहेत. मल्ल्मपूर येथील भूस्खलनाची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. या भूस्खलनामध्ये तीन नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावेळी सुदैवाने एक व्यक्ती थोडक्यात बचावली असल्याचा थरारक प्रसंग या व्हिडिओत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काळ आला होता मात्र... अंगावर भूस्खलन कोसळून ही तो वाचला! पाहा व्हिडिओ


भूस्खलनापासून वाचण्यासाठी जीवाच्या आकांताने छत्री धरलेला एक माणूस आणि एक महिला पळण्याचा प्रयत्न करतानाचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. त्या भूस्खलनातून माणूस वाचला असून ती महिला मात्र त्याखाली दबल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पाऊस आणि पूरामुळे भूस्खलनांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूस्खलनात तीन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details