जयपुर -राजस्थानमधील तापलेल्या राजकारणामध्ये बीटीपी म्हणजे भारतीय ट्रायबल पार्टीने पण मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यापासून फारकत घेण्याचे ठरवले आहे. बीटीपीच्या आमदारांनी सांगितले,की ते कोणा एका व्यक्तीसोबत नसून ते पक्षासोबत आहेत. राजस्थानमध्ये बीटीपीचे राजकुमार रोटा आणि रामप्रसाद हे दोन आमदार निवडून आले आहेत.
राजस्थान सत्तासंघर्ष : काँग्रेसला पाठिंबा दिलेले बीटीपी पक्षाचे आमदारही मुख्यमंत्री अशोक गेहलोतांवर नाराज
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सचिन पायलटने बंड केल्यापासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर अधिक संकटे येऊ लागले आहेत. एकिकडे त्यांना आपल्या पक्षाचे आमदार सांभाळायचे आव्हान आहे, तर दुसरीकडे पक्षाला पाठिंबा दिलेल्या इतर पक्षांच्या आमदारांनाही सांभाळायचे आहे.

बीटीपीच्या आमदारांनी स्पष्ट केले आहे, की त्यांनी आपल्या विचारधारेनुसार निवडणूक लढविली असून त्याप्रमाणेच काम करणार आहे. आम्हांला काँग्रेस पक्षात काय चालले आहे, याचे देणेघेणे नाही.आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारे सोबत आहोत. बीटीपीचा पाठिंबा काँग्रेस पक्षाला होता. तसेच या घडामोडीवर पक्षाची बारीक नजर असून एक बैठक घेऊन पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल.