नवी दिल्ली -मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील तबरेज अन्सारी या बावीस वर्षीय तरुणाची जमावाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे.
'जमावाकडून एका तरुणाचा क्रूर छळ करण्यात येतो. अशी घटना होणे म्हणजे मानवतेवर कलंक आहे. क्रेंद्रात आणि राज्यात भाजपचा आवाज कणखर आहे. तरीही या घटनेवर केंद्र आणि राज्य सरकार शांत आहे. याचबरोबर जखमी तरुणाला चार दिवस ताब्यात ठेवणाऱ्या पोलिसांचा क्रूरपणा हा देखील धक्कादायक आहे', असे राहुल गांधी यांनी टि्वट करुन म्हटले आहे.