महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपचा 'हा' आमदार म्हणतो... 'ईव्हीएममध्ये कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपालाच' - आमदारांचा व्हिडिओ व्हायरल

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ईव्हीएमसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बक्शीस सिंग विर्क

By

Published : Oct 20, 2019, 8:42 PM IST

नवी दिल्ली -हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ईव्हीएमसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईव्हीएममध्ये कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपाकडे जाईल, असे भाजपचे आमदार बक्शीस सिंग विर्क त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटल्याच पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी शेअर केला आहे.


'तुम्ही कुणालाही मतदान करा, मात्र जाईल तर ते भाजपलाच. तुम्ही कुणाला मतदान केले आहे. तेही आम्हाला माहिती होईल. तुम्ही आमच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका. मोदींची आणि मनोहर लाल यांची नजर खुप तीक्ष्ण आहे. तुम्ही मशिनमधील कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपलाच जाईल, याची आम्ही व्यवस्था केली आहे', असे बक्शीस सिंग विर्क म्हणत असल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


हरियाणा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होत असून सत्ताधारी भाजपचा विरोधी काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेल्या जजपाशी संघर्ष आहे. राज्यात पक्षाच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर काँग्रेसने पुनरागमन करावे अशी अपेक्षा असताना भाजपाने या निवडणुकीत ७५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे १ हजार १६९ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या ९० सदस्यी विधानसभेमध्ये भाजपचे ४८ सदस्या आहेत. हरियाणामध्ये २०१४ ला भाजपने प्रथमच स्वबळावर सत्ता गाजवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details