नवी दिल्ली - कोरोना रोगाविरुद्ध लढताना जगभरात प्रत्येक देश आपली चाचणी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार देशात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात एका दिवसात तब्बल 95 हजार कोरोना चाचणी करण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.
देशात दररोज 95 हजार चाचण्या करण्याची क्षमता - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
देशात एका दिवसात तब्बल 95 हजार कोरोना चाचणी करण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.
देशभरामध्ये आतापर्यंत 15 लाख 25 हजार 631 चाचण्या ह्या 332 सरकारी आणि १२१ खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या असल्याची माहिती वर्धन यांनी दिली. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम यांच्याशी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वर्धन यांनी राज्याचे कोरोनाविरोधातील लढ्याचे कौतूक केले.
सिक्किम आणि नागालँड हे अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आठ राज्यांमध्ये एकत्रितपणे फक्त 194 कोरोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. एकूणच ईशान्येकडील 119 जिल्ह्यांपैकी 22 जिल्हे हे कोरोनाबाधित आहेत. संपूर्ण ईशान्य भागात एकूण 16 सरकारी प्रयोगशाळा असून आतापर्यंत या प्रदेशात 27, हजार 558 चाचण्या घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.