महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्यापार बंद पाडण्यासाठी काश्मीरात दहशतवाद्यांनी जाळला ट्रक

लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील बुमीनाबाद येथे ३ दहशतवाद्यांनी एक मालवाहू ट्रक पेटवला. राज्यातील व्यापार  आणि व्यवसाय ठप्प करण्यासाठी तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न दहशतवादी करत आहेत.

प्रतिकात्मक फोटो

By

Published : Oct 6, 2019, 9:26 AM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील वातावरण अशांत ठेवण्यासाठी दहशवाद्यांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील बुमीनाबाद येथे ३ दहशतवाद्यांनी एक मालवाहू ट्रक पेटवला. राज्यातील व्यापार आणि व्यवसाय ठप्प करण्यासाठी तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न दहशतवादी करत आहेत.

हेही वाचा -महिलेला भिंत ओलांडून सिंहासमोर डान्स करणं पडलं महागात



ही घटना शनिवारी दुपारनंतर ४ च्या दरम्यान घडली. पेटवून दिलेल्या ट्रकमध्ये सफरचंद पॅकिंग करण्याचे सामानासह लाकडाचे सामान होते. तर दुसऱ्या एका घटनेत दहशतवाद्यांनी कोकरेनाग येथे नागरिकांवर गोळीबार केला.

याआधीही दहशतवाद्यांनी काश्मीरमधील व्यापार आणि व्यवसाय ठप्प करण्यासाठी एका व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला केला होता. या घटनेत ४ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना छुप्या मार्गाने मदत पुरवण्यात येत आहे. ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यात येत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच नियंत्रण रेषा ओलांडून भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतावाद्याकडून सुरू आहे.

हेही वाचा -गुजरातमध्ये दोन पाकिस्तानी बोटी जप्त; सुरक्षादलाची कारवाई


काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून राज्यातील काही भागांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details