नवी दिल्ली - श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाईतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
श्रीनगर, अवंतीपुरा हवाईतळावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षा दलांना सावधगिरीचा इशारा - सुरक्षा यंत्रणा
गुप्तचर यंत्रणांनी श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाईतळावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे.
संग्रहित छायाचित्र
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मोठी घटना घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाई तळावर हल्ला करू शकतात. यामुळे सुरक्षा दलांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.