कुलगाम - जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील बुचरू येथे दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 12 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला असून त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून एका नागरिकावर गोळीबार - जम्मी काश्मीर न्यूज
एएच मंडू या व्यक्तीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
fire
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास कुलगाम पोलिसांना बुचरु येथे दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी अनंतनाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, एएच मंडू या व्यक्तीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.