श्रीनगर(जम्मू काश्मीर)-केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान आणि एका पाच वर्षाच्या मुलावर गोळी चालवलेल्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर सुरक्षा दलांकडून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे.
बीजबेहरा येथे सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा एन्काऊंटर - जम्मू काश्मीर न्यूज
जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत झाहिद दास या दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याने 26 जूनला हल्ला केला होता. यात एक जवान आणि 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.
सुरक्षा दलांनी दहशतवाद्याला केले ठार
जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत झाहिद दास या दहशतवाद्याचा खात्मा झाला. बीजबेहरा, अनंतनाग येथे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती काश्मीर पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
झाहिद दास याने केलेल्या गोळीबारात 26 जूनला एका सीआरपीएफ जवानाला वीरमरण आले आणि एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.